Homeताज्या बातम्यादेश

साक्षी, विनेश आणि बजरंग नोकरीवर परतले

आंदोलन सुरूच ठेवण्याचा केला निर्धार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून, कुस्तीपटूंनी खळबळ उडवून दिली होत

राज्यात गुुंडांचा उच्छाद
नगरकरांनो, घरपट्टी व पाणीपट्टी माफी मिळणार नाही…; कोविड ही नैसर्गिक आपत्ती नसल्याचे महापालिकेने केले स्पष्ट
शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला चांगलं माहित आहे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून, कुस्तीपटूंनी खळबळ उडवून दिली होती. गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू होते, कुस्तीपटूंकडून ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी कुस्तीपटूंनी भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेग फोगट आणि बजरंग पुनिया या तिघांनी रेल्वेच्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
तिघेही नोकरीवर परतल्यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याची चर्चा चांगलीच रंगली होती, मात्र ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात पैलवानांचे आंदोलन सुरूच राहणार अशी माहिती पैलवानांनी दिली आहे. साक्षी मलिकने ट्विट करत म्हटले की, आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे वृत्त चुकीचे असून, न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणार देखील नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील माझी जबाबदारी पारपाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिला पैलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली होती. काही दिवसांपूर्वी जंतर मंतरवर सुरु असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी बळाचा वापर करून हटकले होते. ज्याच्यानंतर याकारवाई विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पैलवानांनी हरिद्वार येथे जाऊन गंगा नदीत जिंकलेले मेडल अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यावेळी शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी पैलवानांना असे करण्यापासून रोखले होते.

COMMENTS