Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाळ मृदुंगाच्या गजरात अंबानगरीत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत

700 पायी वारकर्‍यांसह पालखीत तीन अश्व, पालखीचे 54 वे वर्ष

अंबाजोगाई प्रतिनिधी-  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाई शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमनु झाले. शहरातील संत

‘सामाजिक न्याया’ चा पुरस्कर्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज
उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू
प्रा. अशोक लोळगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

अंबाजोगाई प्रतिनिधी-  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाई शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमनु झाले. शहरातील संत भगवानबाबा चौकात संकेत राजकिशोर मोदी यांनी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीस पुष्पहार अर्पण करून व महाराजांच्या मूर्तीस पुष्पअर्पण करून स्वागत केले. यावेळी संकेत मोदी यांच्या समवेत माजी नगरसेवक अमोल लोमटे,शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय रापतवार, सचिव विष्णू सरवदे, सचिन जाधव, शुभम लखेरा,आकाश कर्‍हाड, आदीजण उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढून अंबानगरी सज्ज झाली होती.
26 मे 2023रोजीघ आषाढी वारीसाठी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोनच दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकर्‍यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकर्‍यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले. पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे असा लवाजमा असायचा परंतु गेल्यात काही वर्षापासून फक्त आश्वच या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. प्रस्थानाच्या मार्गावर विविध गावांमध्ये शहरांमध्ये संत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा केली जाते. पालखीचे हे  54  वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून तीन अश्व आणि 700 वारकरी सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत. हा  संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्धव विशिष्ट अशा चौकटीत मार्गक्रमण करणारा म्हणून ओळखला जातो. श्री संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 15 गुरुवारी सकाळी 8.00 वाजता संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.

COMMENTS