अहिल्याबगर / सहारा सर्वांगीण विकास संस्था श्रीगोंदा आणि कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 04.07.2025 रोजी लोणी व्यंकनाथ येथे महिलांच
अहिल्याबगर / सहारा सर्वांगीण विकास संस्था श्रीगोंदा आणि कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 04.07.2025 रोजी लोणी व्यंकनाथ येथे महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेला “महिला मार्गदर्शन व विशेष सन्मान सोहळा” उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजनही करण्यात आले आणि 85 मुलांना दप्तर पाणी बॉटल व संपूर्ण शालेय साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणी व्यंकनाथचे प्राचार्य ए. एल. पुराणे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. महेंद्र शिंदे , डॉ.आर्शिया शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी पल्लवी सोनवणे, संतोष जठार आणि कोरो संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक सोनम धिवर , सुनिता दरवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात अकबर इनामदार, कराळे भाऊसाहेब, पुराने सर, श्रुती बोराडे यांचा भारतीय संविधानातील उद्देशिकेची फ्रेम आणि महापुरुषांचे पुस्तक व फेटा आणि गुलाब पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव प्राप्त केला.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले होते. महिला उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत त्यांचं मनोबल उंचावणारे मार्गदर्शन लाभले. सन्मानपत्र व्यक्तींनी आपले अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली तर श्रुती बोराडे व मंदा जावळे यांनी चळवळीचे गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भोसले यांनी केले. तर आभार प्रदर्शन छाया भोसले यांनी केले.
या कार्यक्रमासाठी लोणी ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत मगर, लोणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कराळे भाऊसाहेब,भाऊसाहेब डांगे ,संतोष गोरखे, सुभाष बोराडे,पवन रणदिवे,सोनवणे साहेब, उपसरपंच अमोल उबाळे ,सलमान शेख, नितनवरे नाना ,उमेश चव्हाण, शेख सर , ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर, उज्वला मदने, संध्या काकडे ,सुजाता काकडे ,अनुराधा काकडे ,पूजा लडकत, वंदना धोत्रे ,सविता निंबाळकर, छाया खलाटे, सुप्रिया जाधव ,सोनाली काकडे, मीना नेटवटे गुड्डी चव्हाण हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया भोसले, पवन रणदिवे, सलमान शेख, गंगाराम निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.


COMMENTS