Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन

छत्रपती संभाजी नगर- आपणास कळविताना अत्यंत दुःख होत आहे की पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर प्रणेते, आंबेडकर चळवळीतील आग्र

विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपले
  पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी केली राम मंदिर परिसराची पाहणी  
शिक्षण, नोकर्‍यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार

छत्रपती संभाजी नगर- आपणास कळविताना अत्यंत दुःख होत आहे की पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर प्रणेते, आंबेडकर चळवळीतील आग्रगण्य नाव, चळवळीचे पितामह, माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे  साहेब यांचे दिनांक 04/05/2024 रोजी पहाटे 4.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीचे उपचार चालू होते परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत दिनांक 04/05/2024 रोजी शनिवार या दिवशी मावळली.

 त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना  माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. असा नेता पुन्हा होणे नाही. अशा या दृढ नेत्यास माझा अखेरचा निळा सलाम… त्यांचा मृत्यदेह दर्शनासाठी पक्ष कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक 05/05/2024 रोजी रविवार या दिवशी दुपारी ठीक 12.00 ते 5.00 वाजता ठेवण्यात येणार आहे.

COMMENTS