Homeताज्या बातम्याक्रीडा

गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भेटण्याचे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते. क्रिकेटवर प्रेम

मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर
नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भेटण्याचे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्याला सचिन तेंडुलकरला भेटण्याची नक्कीच इच्छा असते. दरम्यान, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर त्याच्या कारमधून कुठेतरी जात आहे. मग वाटेत त्याची नजर मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या चाहत्यावर पडली आणि जर्सीच्या पाठीमागे तेंडुलकर असे लिहिलेले होते. सचिनने लगेच गाडी थांबवली आणि चाहत्याशी बोलू लागला. एवढं मोठं सरप्राईज पाहून चाहत्यांलाही आश्चर्य वाटलं आणि तो भावूक झाला. सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा मी माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करताना पाहतो तेव्हा माझे हृदय आनंदाने भरते. हे लोकांचे प्रेम आहे जे अनपेक्षित कोपऱ्यातून येत राहते जे आयुष्य खूप खास बनवते. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

COMMENTS