Homeताज्या बातम्यादेश

रशियाचे चांद्रयान ‘लूना-25’ कोसळले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः रशियाच्या चांद्रयान मोहिमेला रविवारी मोठा धक्का बसला आहे. भारताच्या चांद्रयान पाठोपाठ चंद्रावर पाठवण्यात आलेले रशियाचे ‘लू

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
चांदोली येथे वीजनिर्मिती सुरू; पाणी साठ्यात वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः रशियाच्या चांद्रयान मोहिमेला रविवारी मोठा धक्का बसला आहे. भारताच्या चांद्रयान पाठोपाठ चंद्रावर पाठवण्यात आलेले रशियाचे ‘लूना-25’ यान रविवारी (दि.20) चंद्राच्या कक्षेत अतिम टप्प्यात असतानाच ’लूना 25’चें लँडर हे चंद्रावर क्रॅश झाले आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचे रशियाचे स्वप्न भंगले आहे.
सोमवारी (21 ऑगस्ट) लूना 25 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होते. मात्र त्यापूर्वी शनिवारी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळले असल्याचे रशियाने सांगितले. 1976 साली पार पडलेल्या र्ङीपर 24 या मोहीमेनंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना 25 कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना-25 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. शनिवारी (19 ऑगस्ट) लूना-25 ला चंद्राच्या आणखी जवळच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होता. लँडिंगसाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. मात्र, यावेळी लूना-25 च्या लँडरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचले. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झाले. यानंतर रॉस्कॉस्मॉसमधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळाले नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचे रॉस्कॉस्मॉसने स्पष्ट केले आहे.

COMMENTS