Homeताज्या बातम्याविदेश

रशियन सैन्याने चुकून स्वतःच्याच देशात टाकला बॉम्ब

मास्को/वृत्तसंस्था : युक्रेनच्या सैन्याविरुद्ध संघर्ष सुरू असताना रशियन सैन्याने चुकून स्वत:च्याच देशातील शहरावर बॉम्ब टाकला आहे. एक वर्ष उलटून ग

राष्ट्रसण आणि कायदा
अहमदनगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली
कानडगाव येथे सशस्त्र दरोडा

मास्को/वृत्तसंस्था : युक्रेनच्या सैन्याविरुद्ध संघर्ष सुरू असताना रशियन सैन्याने चुकून स्वत:च्याच देशातील शहरावर बॉम्ब टाकला आहे. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरूच आहे. चिमुकला युक्रेन चिवटपणे झुंज देत असल्याने रशियाची दमछाक झाली आहे.  रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्लेच सुरूच आहेत. हे युद्ध सुरू असताना वेगळीच बातमी समोर आली आहे. रशियन सैन्याने चुकून आपल्याच देशातील शहरावर बॉम्ब टाकल्याचे उघडकीस आल आहे. त्यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या लढाऊ विमानातील सैनिकांकडून गुरुवारी रात्री ही मोठी चूक झाली. युक्रेनला प्रत्युत्तर देताना रशियाच्या लढाऊ विमानाने आपल्याच देशातील बेल्गोरोड या शहरात बॉम्ब टाकला. हा बॉम्ब इतका मोठा होता की शहरात सुमारे 40 मीटर अंतरापर्यंतचा खड्डा पडला. जिथे बॉम्ब पडला त्या भागातील इमारतींचेही नुकसान झाले. एक कारही उद्ध्वस्त झाली.

COMMENTS