Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे

पाथर्डी/प्रतिनिधीः महासत्तेची स्वप्न पाहणार्‍या देशात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर असून सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या नादात आपण देश कोठे

शारदा ज्युनिअर कॉलेजचा निकाल 87.18%
129 गावांतील साडेआठ हजारावर शेतकर्‍यांचे गारपिटीत नुकसान
क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांना भारतरत्न द्या : माधवराव तिटमे

पाथर्डी/प्रतिनिधीः महासत्तेची स्वप्न पाहणार्‍या देशात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर असून सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या नादात आपण देश कोठे घेऊन चाललो आहे. याचा विचार सर्वांना करावा लागणार आहे.अन्यथा देशातील ग्रामीण भागातून स्वातंत्र्याचा नवा आवाज येईल आणि तो कोणालाही परवडणारा नसेल. असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे बोलत होते.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन,पिरामल स्वास्थ्य व वनमित्र सेवा मंडळाच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्संट्रेन्टर मशीन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे बोलत होते.संस्कार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास दिवाकर भोयर,प्रदीप बांगर,केदारेश्‍वर चे अध्यक्ष  ऋषिकेश ढाकणे,डॉ. भगवान दराडे,शिवशंकर राजळे,बंडुपाटील बोरुडे,सीताराम बोरुडे,गहिनीनाथ शिरसाठ,पांडुरंग शिरसाठ,बापू नरवडे,महेश शेकडे हे उपस्थित होते.  या वेळी बोलताना पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की,स्वातंत्र्यानंतर दूरदृष्टी ठेवत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रोसह इतर संशोधन करणार्‍या संस्था स्थापन केल्या नसत्या, तर आज आपण चांद्रयान-3 चे यश पाहू शकलो नसतो. मध्यंतरी कोरोनाचे संकट आल्यानंतर ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला होता.या संकटावर जगातल्या सर्व संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करत मात केली.आपण एकीकडे चंद्रावर जरी पोहोचलो असलो. तरीही आजही आदिवासी भागात अन्नावाचून माणसे मरत आहे. अनेक गावात जायला रस्ता नाही. बेरोजगारी वाढत चालली असल्याने अंतर्मुख होण्याची गरज आहे. आज जी मदत रुग्णांसाठी दिली जात आहे. ती मदत ही एकप्रकारे शासनाला केलेली मदत असल्याचे शेवटी ते म्हणाले. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे अहमदनगरचे विभाग प्रमुख दिवाकर भोयर यांनी त्याच्या संस्थेच्या कामाचा रूपरेषा सांगत होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणासंबंधी माहिती देत यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक ऋषिकेश ढाकणे सूत्रसंचालन गणेश सरोदे तर आभार योगेश रासने यांनी मानले.

COMMENTS