Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विलास सहकारी साखर कारखाना युनिट-2 चे रोलर पूजन

लातूर प्रतिनिधी - उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट- 2 तोंडार येथील कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 ची तयारी अंतीम

एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थिती पाल येथे खंडोबा यात्रा
तज्ज्ञांच्या मते, सत्ताबदल अटळच !

लातूर प्रतिनिधी – उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट- 2 तोंडार येथील कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 ची तयारी अंतीम टप्पयात आली असून तांत्रीक कामे पुर्णत्वास आली आहेत. या अनुषंगाने कारखाना मील रोलरचे विधीवत पुजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकाच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र व्यंकटराव काळे, कार्यकारी संचालक ए. आर. पवार लातूर जिल्हा बँकेच्या संचालीका लक्ष्मीबाई भोसले, लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटुरे व संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, युवराज जाधव, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, भारत आदमाने, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, निमंत्रीत संचालक सर्वश्री रामराव बिरादार, कल्याण पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडित ढगे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, मारोती पांडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रिती भोसले, मधुकर एकूर्गेकर यांची उपस्थिती होती.
लोकनेते विलासरावजी देशमुख यांची प्रेरणा, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे नियोजन तसेच कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनिट-2 प्रत्येक हंगामात विक्रमी गाळप उदिष्ट पूर्ण करीत आहे. यासाठी येणा-या गळीत हंगाम 2023-24 साठीची देखील अंतर्गत तांत्रीक व साफसफाईची कामे वेळेवर केली गेली आहेत, ही सर्व कामे अंतीम टप्प्यात आली आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली. तर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊसातोडणी व वाहतूक यंत्रणाची उभारणी करण्यात आली आहे, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी सांगीतले. कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी कारखाना अंतर्गत सुरु असलेल्या कामाची व कारखाना उभारणी करीत असलेल्या आसवनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून माहीत घेतली. तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत खाते प्रमुख, विभाग प्रमुख व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थीत होते.

COMMENTS