Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहमारेचा साहिल रामेश्‍वर रणसुरे याची बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव ः संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय व अहमदनगर जिल्हा बेसबॉल संघटना यांच्या वतीने संजीवनी महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय खुल्या बेसबॉल स्

कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला
गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील
दैनिक लोकमंथन l देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री

कोपरगाव ः संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय व अहमदनगर जिल्हा बेसबॉल संघटना यांच्या वतीने संजीवनी महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय खुल्या बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव च्या मुलांच्या संघाने 19 वर्षे वयोगटात सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेतून कनिष्ठ महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी साहिल रामेश्‍वर रणसुरे याची निवड 29 ऑगस्ट रोजी अमरावती येथे होणार्‍या ज्यूनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे  त्याबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीव दादा कुलकर्णी प्राचार्य बी. बी भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी साहीलचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

COMMENTS