नवी दिल्ली ः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात दाखल करण्यात

नवी दिल्ली ः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित तपासात एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. बँकेच्या शाखेत पाण्यामुळे वाड्रा यांच्या कंपनी मेसर्स स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी नष्ट झाल्याची माहिती युनियन बँक ऑफ इंडियाने हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. एसआयटी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात भ्रष्ट रिअल इस्टेट व्यवहारात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची चौकशी करत आहे.
COMMENTS