Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा

नगरच्या तपोवन रोडवरील घटना, पोलिसांनी डीजे केला बंद

अहमदनगर प्रतिनिधी - लग्न हळदीच्या कार्यक्रमात विनापरवाना सार्वजनिक रस्ता आडवून लाईटींग व डीजे लावल्याने नवरदेवासह डीजे व लाईटींगच्या मालकाविरुध

दहेगाव बोलक्यात दरोडा, साडेतीन लाखांची जबरी चोरी.
LokNews24 l लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल, शिवसेनेची टीका
नगर मनपाचे नगरसेवक फक्त सांगकामे झालेत…भाजप नगरसेवक कोतकरांचा उद्विग्न दावा

अहमदनगर प्रतिनिधी – लग्न हळदीच्या कार्यक्रमात विनापरवाना सार्वजनिक रस्ता आडवून लाईटींग व डीजे लावल्याने नवरदेवासह डीजे व लाईटींगच्या मालकाविरुध्द येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. तपोवन रोडवरील थ्री डी कॉर्नर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. नवरदेव सागर गुंड (वय 26, रा. तपोवन रोड), डीजे मालक अक्षय राजू कर्डिले (वय 28 रा. निर्मलनगर, सावेडी) व लाईटींगचे मालक सागर दत्ता इंगळे (रा. बालिकाश्रम रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सागर गुंड याच्या हळदी कार्यक्रमासाठी तपोवन रोडवरील थ्री डी कॉर्नर येथे सार्वजनिक रस्ता बंद करून लाईटींग व डीजे लावण्यात आला आहे, अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार शिरसाठ, सचिन जगताप, वसिम पठाण, वाकचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विनापरवाना डीजे स्पीकर व लाईटींग लावून सार्वजनिक रस्ता अडविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तत्काळ डीजे बंद करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या नवरदेवासह डीजे व लाईटींग मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी – नगरमध्ये अनेक ठिकाणी वाढदिवस, दुकाने वा आस्थापने उदघाटने वा विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्ता अडवून मंडप टाकून बिनधास्त कार्यक्रम दणक्यात केले जातात. मंडपांमध्ये जेवणाच्या पंक्तीही बसवल्या जातात. तसेच रस्ता अडवून मंडप टाकल्यावर त्याची माहितीही कोणी देत नाही. वाहनचालक या मंडपांजवळ आल्यावर त्यांना कळते की, पुढे रस्ता बंद आहे. अशावेळी रस्ता बेकायदेशीरपणे बंद करणारांना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहत वाहनचालक पुन्हा वळून मागे येऊन दुसर्‍या रस्त्याने मार्गस्थ होतात. पण रस्ते अडवण्याच्या प्रकारांकडे कोणी तक्रार केली नाही तर पोलिसही दुर्लक्ष करतात. मात्र, पोलिसांच्या गस्ती पथकांनी सतत फिरते राहून असे रस्ते अडवून सार्वजनिक वाहतुकीला अडथळे करणारांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS