कोपरगाव प्रतिनिधी ः सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यापासुन लाखो रुपये खर्च करुन बंद असलेले नाटेगाव येथील जलशुद्धीकरण
कोपरगाव प्रतिनिधी ः सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यापासुन लाखो रुपये खर्च करुन बंद असलेले नाटेगाव येथील जलशुद्धीकरण संयंत्र सुस्थितीत असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. गटविकास अधिकार्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत ही बाब लक्षात येताच 24 तासात ग्रामस्थांना पाणी मिळालेच पाहिजे अशी भूमिका गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी घेत, दुसर्याच दिवशी हा आरओ प्लन्ट चालू करुन गावकर्यांना शुद्ध पाणी दिल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांना विशेष धन्यवाद दिले.
नाटेगाव येथील आरओ प्लन्टचे उद्घाटन होऊन तीन महिने झाले तेव्हा पासून हे जलशुध्दीकरण सयंत्र बंदच असल्याचे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून वंचित रहावे लागत असल्याने हा आरओ प्लन्ट चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे वेळोवेळी मागणी करुणही ग्रामस्थांच्या या मागणीकडे तत्कालीन सरपंच व कर्तव्यात कसुर करणार्या ग्रामसेवकाने सपसेल दुर्लक्ष करत ग्रामस्थांना शुध्द पाणी मिळण्यापासुन वंचित ठेवले ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकार्यांना याची माहिती दिली. लाखो रुपये खर्च करूनही आरो प्लाट बंद कसा, असा प्रश्न गटविकास अधिकारी यांना पडला. यावर त्यांनी स्वतःच नाटेगाव येथे भेट देऊन खातरजमा केली. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे नवीन आरो प्लांट बंद असल्याचे दिसून आले. 24 तासाच्या आत प्लांट सुरू करण्याच्या सूचना दिल्या. गावकर्यांसमक्ष सरपंच यांना देखील तसेच सूचित केले. तालुका स्तरावरून तंत्रज्ञ पाठवून प्लांट सुस्थितीत असल्याची खातरजमा केली. आणि सायंकाळी गावातील सर्व कुटुंबांना वॉटर एटीएम कार्ड वाटप करून आरो प्लांट सुरू झाल्याची खातरजमा केली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची अडचण जाणवत आहे. अशा परिस्थितीत जलशुद्धीकरण संयंत्र सुस्थितीत असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागले या गोष्टीची गंभीर दखल तालुका प्रशासनाने घेतल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचे आभार मानले. तर कर्तव्यात कसुर करणार्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली.
COMMENTS