Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरआयटीच्या ऋतुराज पाटीलची शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड

इस्लामपूर : ऋतुराज पाटील याचे अभिनंदन करताना डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, डॉ. एल. एम. जुगुलकर, डॉ. संदीप पाटील. इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील इन्स्टिट्

मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत
वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, इस्लामपूर या महाविद्यालयाच्या बी. टेक. मेकॅनिकलमध्ये शिकत असलेला विद्यार्थी ऋतुराज युवराज पाटील याची दि. 8 मार्च ते 13 मार्च 2022 अखेर शिवाजी युनिर्व्हसिटी, ग्वाल्हेर येथे होणार्‍या पश्‍चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी संघामध्ये निवड झाली.
ऋतुराज पाटील याच्या नेतृत्वाखाली आरआयटीच्या संघाने यंदा सांगली विभागीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले आहे. बास्केटबॉल हा खेळ कोल्हापूर बरोबर मिरज येथे खूप मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. तरीही अंतिम सामन्यात ऋतुराजच्या उत्कृष्ट खेळामुळे व इतर खेळाडूंच्या सहकार्याने आणि महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने मिरज महाविद्यालय मिरज या संघावर मात करत विजेते पद मिळविले. ऋतुराज याच्या उत्तम खेळामुळे त्याची शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाली.
आरआयटीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी सहभागी होण्याची संधी प्राप्त होत असते. त्याच्या निवडीबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, संचालिक डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, डीन डॉ. एल. एम. जुगुलकर यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS