Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी

तीन वर्षासाठी एनबीएचे नामांकनइस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर येथील एमबीए विभ

उपोषण करताच पाच तक्रारींचा झाला निपटारा; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ; ग्रामसेवकाचे निलंबन
विजबिलाच्या वसूलीसाठी ना. रामराजे यांनी दिलेल्या सूचनेला बळीराजा संघटनेचा विरोध
आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

तीन वर्षासाठी एनबीएचे नामांकन
इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर येथील एमबीए विभागाला राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल बोर्ड ऑफ क्रीडीटेशन (एनबीए), नवी दिल्ली यांच्याकडून नामांकन प्राप्त झाले आहे. दि. 22, 23 व 24 ऑक्टोंबर, 2021 रोजी झालेल्या मुल्यांकनानुसार नामांकन देण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, महविद्यालयातील उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे यश, महाविद्यालयातील विविध उपक्रम व प्रक्रिया, संशोधनातील योगदान, माजी विद्यार्थी, पालक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांचे अभिप्राय यांसारख्या बाबींवर हे मुल्यांकन दिले जाते.
कासेगाव शिक्षण संस्थेचे, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर हे गेली 38 वर्षे तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर राहिले आहे. सन 1994 साली एमबीए विभागाची सुरुवात करण्यात आली. सुरवातीपासून दर्जेदार शिक्षण आणि जगातील नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची संधी यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थी व्यवस्थापन शिक्षणासाठी नेहमीच आरआयटी एमबीएला पसंती देतात.
डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, एमबीए विभागाने मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात एमबीए शाखेला एनबीएचे नामांकन मिळवणार्‍या मोजक्या महाविद्यालयापैकी आरआयटी एक आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात एकमेव महाविद्यालय आहे. अत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर, विद्यार्थ्यांसाठी विविध टेक्निकल इव्हेंट्स व शिक्षकांसाठी डेव्हलपमेंट प्रोग्राम यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन शिक्षण देण्यात एमबीए विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एमबीए इन आयईव्ही हि नवीन शाखा सुरु केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून आरआयटी एमबीए उद्योजकता शिबिरे, औद्योगिक भेटी, तज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी, पालक आणि गुंतवणूकदारांसाठी कार्यशाळा यांसारखे विविध उपक्रम राबवत असतो. यामुळे विद्यार्थ्यांना खात्रीशीर नोकरी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालयाला सातत्याने यश मिळते आहे.
महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, सदस्य प्रा. शामराव पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी विभाग प्रमुख डॉ. हेमलता गायकवाड, एनबीए समन्वयक डॉ. कृष्णाजी पाटील आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, डीन डॉ. सचिन पाटील, डीन डॉ. एस. आर. पाटील व रजिस्ट्रार यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS