Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

1.89 मिटरने भूजल पातळीत वाढ

लातूर प्रतिनिधी - जिल्हयात गेल्या तीन वर्षीपासून पावसाळयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस होत आहे. शेतकरीही पाण्याचा रब्बी पिकांना जपून वापर करत आहेत. त

 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 
जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी
बोरगावकरांच्या ’नदीष्ट’ला 5 लाखांचा भाषा सन्मान

लातूर प्रतिनिधी – जिल्हयात गेल्या तीन वर्षीपासून पावसाळयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस होत आहे. शेतकरीही पाण्याचा रब्बी पिकांना जपून वापर करत आहेत. त्यामुळे पाण्याचाही उपसा कमी होत आहे. वरिष्ठ भूजल विभागाच्यावतीने मार्च मध्ये भूजल पातळीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत मार्च मध्ये 1.89 मिटरने वाढ झाल्याचे समोर आले आहे. लातूर जिल्हयातील 109 जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार मार्च अखेर जिल्हयातील भूजल पातळीची तपासणी वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत 1.89 मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
लातूर जिल्हयात सरासरी 791.60 मिमी पाऊस पडतो. तो गेल्यावर्षी 886.90 मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या 112 टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील व इतर पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. तसेच जिल्हयाच्या भूजल पातळीतही वाढ झाल्याचे भूजल विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी व इतर पिकांसाठी पाण्याचा उपसा होत आहे. गेल्या पाचवर्षाच्या तुलनेत यावर्षी 1.89 मिटरने लातूर जिल्हयातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. यात लातूर तालुक्याची 2.88 मिटरने भूजल पातळी वाढली आहे. औसा तालुक्याची 3.06 मिटर, चाकूर तालुक्याची 1.59 मिटर, अहमदपूर तालुक्याची 2.58 मिटर, शिरूर अनंतपाळ 0.66 मिटर, रेणापूर तालुक्याची 2.46 मिटर, निलंगा तालुक्याची 0.68 मिटर, उदगीर तालुक्याची 2.08 मिटर, जळकोट तालुक्याची 2.47 मिटर, देवणी तालुक्याची 0.47 मिटरने वाढ झाली आहे.

COMMENTS