मुंबई : राज्यातील 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी बोलता

मुंबई : राज्यातील 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी बोलतांना मंत्री सरनाईक म्हणाले की, आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत. आम्ही त्यांना पुरस्कार देणार आहोत. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरिल जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अनुदान देणार आहोत. याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल. हे अनुदान आम्ही एकदाच देणार आहोत. 10 हजार पुरस्कार म्हणून एकदाच देणार आहोत. आमच्या विभागाच्या माहितीनुसार आजमितीस राज्यात 14 हजार 387 रिक्षालाचक हे 65 वर्षांवरिल आहेत. त्यांना यावर्षी आम्ही 10 हजारांची रक्कम देणार आहोत, अशी घोषणा सरनाईक यांनी केली. ते मुंबई पार पडलेल्या आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलत होते.
सरनाईक पुढे म्हणाले, ज्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने मंडळ स्थापन केले. आम्ही आता निर्णय घेतला की, 27 जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल. 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आलेली आहे. ’धर्मवीर आनंद दिघे यांच्या महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ’, असे त्याचे नाव असणार आहे. आम्ही लोगोचे प्रकाशन सुद्धा मार्च महिन्यात करणार आहोत. कारण आमचा परिवहन दिवस असतो, त्यादिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडेल अशी माहिती देखील सरनाईक यांनी दिली आहे.
COMMENTS