Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फॉर्च्यूनरच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

मुंबई ः मुंबईच्या कांदिवली ठाकूर व्हिलेजमध्ये भरधाव फॉर्चूनरने धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (1, सप्टेंबर) रात्री 2 वाज

वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार

मुंबई ः मुंबईच्या कांदिवली ठाकूर व्हिलेजमध्ये भरधाव फॉर्चूनरने धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (1, सप्टेंबर) रात्री 2 वाजता ही दुर्देवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या कांदिवली ठाकूर व्हिलेजमध्ये रात्री दोनच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेली फॉर्च्युनर कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. याबाबतची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी कार चालकाचा सध्या शोध सुरू आहे.

COMMENTS