Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पणुंब्रे वारूण येथे आत्मा योजनेअंर्गत तांदूळ महोत्सव

पणुंब्रे वारूण : महोत्सवात तांदळाच्या विविध जातीची माहिती घेताना शेतकरी. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकां

म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई
राजारामबापू दूध संघाची विनाकपात 31.30 कोटीची दिवाळी भेट
आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असेल- राजू शेट्टी (Video)

शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांना तांदूळ विक्रीचा अभिनव प्रयोग
शिराळा / प्रतिनिधी : शेतकर्‍यांना विस्तार सेवा पुरवून शेतकर्‍यांच्या गरजांवर आधारित सुयोग्य व आवश्यक मार्गदर्शनाची नितांत गरज महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत जोर्तिलिंग शेतकरी बचत गट पणुंब्रे वारूण यांचे संयुक्त विद्यमाने पणुंब्रे वारूण, ता. शिराळा येथे तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाताच्या नामशेष होत चाललेल्या औषधी गुणधर्म असणार्‍या विविध 11 जातींच्या वाणांचा तांदूळ महोत्सव भरवण्यात आला होता. महोत्सवामध्ये नैसर्गिक मध, सेंद्रिय नाचणी व वरी विक्रीसाठी बचत गटामार्फत ठेवण्यात आले होते.
अनेक वर्ष शेतकरी संकटात होता आणि आता कोरोना शेतकरी आंदोलनामुळे आपला शेतकरी अवघड काळातून जात आहे. या संकटामुळे शेतकरी भरडला जात आहे. त्याचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, सांगली मनोजकुमार वेताळ यांनी खरीप हंगामामध्ये भाताच्या नामशेष होत चाललेल्या औषधी गुणधर्म असलेल्या विविध 11 वाणांमधील कर्करोग, सांधेदुखी, मधुमेह, रक्ताची कमतरता कमी करणारे, आयर्न व झिंक यांची कमतरता दूर करणारे, गरोदर महिला व लहान बालकांसाठी उपयुक्त वाणांचे संवर्धन व संगोपन करुन या वाणांच्या बाजारपेठेतील मागणी व हमीभाव मिळत असल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी या वाणांची लागवड करून निरोगी व सदृढ आरोग्य व आर्थार्जन वाढवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास कृषि विकास अधिकारी विनायक कुंभार, मिरज उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व शिराळा तालुक्यातील सर्व मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषि सहाय्यक, शेतकरी मित्र, प्रगतशील शेतकरी, ज्योर्तिलिंग शेतकरी बचत गटातील सर्व सदस्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
शेतकरी मित्र हा गावस्तरावरील आत्मा संस्थेचा महत्वाचा दुवा आहे. शेतकरी मित्रांमार्फत विस्तार सेवा गावस्तरापर्यंत पोहोचविल्या जातात. शेतकरी सल्ला समिती आणि गट तंत्रज्ञान चमू व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तालुकास्तरावर वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सर्व विस्तार कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहाय्य होते. भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठी सर्वसमावेशक व सहभागी धोरण राबविण्याबरोबर शेतकर्‍यांना विस्तार सेवा पुरवून शेतकर्‍यांच्या गरजांवर आधारित सुयोग्य व आवश्यक मार्गदर्शनाची नितांत गरज असते. सन 1998 साली महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी म्हणजेच आत्माची स्थापना झाली.
तांदूळ महोत्सवात नागरिकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सभासदांपैकी कोणीही व्यापारी नाही. ना नफा ना तोटा तत्त्वावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
अंकुश पाटील
माजी उपसरपंच, पणुब्रे वारुण

COMMENTS