Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्काऊटचे पुनुरुज्जीवन ही काळाची गरज- डॉ. सुधीर तांबे

इंटरनेट आधारित समूह माध्यमाच्या युगात विद्यार्थी सामाजिक आणि मानवतवादी मूल्यांपासून दूर जाऊ लागले असताना स्काऊट-गाईड या अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक

मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीचे वाळू उपसाविरोधात आंदोलन
डॉ. विशाखा सोनवणे एम.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसाठी मतदार सुलभता केंद्रांची स्थापना

इंटरनेट आधारित समूह माध्यमाच्या युगात विद्यार्थी सामाजिक आणि मानवतवादी मूल्यांपासून दूर जाऊ लागले असताना स्काऊट-गाईड या अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रमाचे पुनरुज्जीवन होणे ही काळाची गरज आहे. स्काऊट-गाईडच्या माध्यमातून आदर्श नागरिक आणि सक्षम राष्ट्र घडेल असा विश्वास सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री संस्था आणि माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्था यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या एक दिवसीय स्काऊट प्राशिक्षण शिबिरात ते बोलत होते. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित शाळांमधील ४० शिक्षक-शिक्षिका  यात सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या सर्व २८ शाळा आणि महाविद्यालयांमधून स्काऊट उपक्रम नव्या जोमाने सुरु करण्यात आला आहे. एक दिवसीय कार्यशाळा ही त्याची सुरुवात आहे.

शैक्षणिक संस्थांमधील सार्वजनिक सुविधा तसेच वर्गातील पंखे यांची मोडतोल, मादक पदार्थांचे सेवन, वैयक्तिक जीवनात आलेल्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे आत्महत्येसारखी किंवा गुन्हेगारी स्वरुपाची कृती करणे ही प्रवृत्ती शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये वाढू लागली आहे. सामाजिक आणि मानवतावादी मूल्ये कमी होऊन लागली आहेत, हेच यांचे मुख्य कारण आहे. या मूल्यांचे बीजारोपण, जोपासना आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. स्काऊट-गाईड ही सामाजिक मूल्ये वाढविण्याचे काम करतात. राष्ट्र उभारणी करणारी ही चळवळ आहे, असेही डॉ. तांबे पुढे म्हणाले.

ज्ञानमाता हायस्कूलमधील आपल्या विद्यार्थीदशेत स्काऊटमध्ये सक्रीय असताना स्काऊट प्रमुख फादर अल्बर्ट हुबर यांनी केलेल्या संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडले, असा कृतज्ञतापूर्ण उल्लेख डॉ. तांबे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात गेली काही वर्षे स्काऊट-गाईडचे कार्य मंदावले आहे. त्याला चालना देण्यासाठी आपले गुरु रत्नाकर पगारे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली सह्याद्री शिक्षण संस्था स्काऊटचे पुनरुज्जीवन करणार आहे. शिक्षकांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे रजिस्ट्रार बाबुराव गवांदे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि शारिरिक सुदृढता वाढीस लावण्यासाठी स्काऊट आवश्यक आहे. स्काऊट ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. निर्णयक्षमता, निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांची जाण विद्यार्थीदशेतच निर्माण व्हायला हवी.

 संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर म्हणाले,आदर्श नागरिक आणि सुदृढ समाज घडविण्याचे कार्य शिक्षक वर्षानुवर्षे करत आले आहेत. बदलत्या काळात विद्यार्थ्यांना वळण शिक्षा करण्यावर निर्बंध आले आहेत, परंतु विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त वाढू नये म्हणून स्काऊटमधून खेळकर पद्धतीने  हे कार्य करता येते. त्यासाठी शिक्षकांनी कार्यरत व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

चार सत्रांच्या या शिबिराची सुरुवात रत्नाकर पगारे गुरुजी यांनी केली. दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळविलेले, ८५  वर्षांचे पगारे गुरुजी ज्ञानमाता शाळेतील स्काऊटचे प्रमुख आणि  माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत. सलग दोन तास त्यांनी स्काऊटचा इतिहास, तत्वज्ञान, उद्धिष्ट आणि व्यवस्थापन यांची प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती दिली. चार भिंतींच्या वर्गाबाहेर दिले जाणारे हे जीवनावश्यक आणि कृतीनिर्धारित शिक्षण आहे, असे ते म्हणाले. म्हणून स्काऊट निसर्ग शिबिरांना अधिक महत्व आहे. ही शिबिरे विद्यार्थ्यांसाठी खुप मार्गदर्शक ठरतात, असेही ते म्हणाले.

निसर्गाच्या वातावरणात शिस्तीत मस्ती करताना निरीक्षणातून विद्यार्थी शिकत जातात. स्काऊटच्या अनेकविध उपक्रमात खेळातून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, श्रवणशक्ती, गंधांची जाण याचबरोबर कौशल्य विकास, शीलसंवर्धन आणि शारीरिक सुदृढता  वाढीस लावली जाते, असे पगारे सरांनी यावेळी सांगितले. जीवनात सर्वात सुंदर काय असेल तर, माझा देश, माझा गाव, माझी शाळा आणि माझी आई ही सौंदर्य जाण विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्वाचे कार्य स्काऊट करते. त्यात शिक्षकांचा सिंहाचा वाट असतो हे मनी बाळगून शिक्षकांनी ‘सदा तत्पर’ हे स्काऊटचे ब्रीद अंगी बाणावे असे आवाहन त्यांनी केले.

दुसऱ्या सत्रात संस्थेचे सचिव हवाई दल आणि मुंबई पोलीस विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत राहिलेले नारायण उगले यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत आरोग्य आणि स्वच्छता बिंबविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावायाच्या धड्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. सामाजिक सुरक्षितता आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी विद्यार्थायांमध्ये मूलभूत जाणीव कशी करावी याची माहिती दिली.

तिसऱ्या सत्रात संस्थेचे उपसचिव दिगंबर बंदावणे यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करणे हे शिक्षकांनी आपले आद्य कर्तव्य मानावे असे निक्षून सांगितले. ते म्हणाले स्काऊट हे प्रात्यक्षिकावर अधिक भर देते. त्यातून सांघिक भावना, सेवाभावी वृत्ती वाढीस लागते. निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. ही जिज्ञासा त्यांना संशोधनाकडे नेते. मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होतील असे वातावरण त्यांना द्यायला हवे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ही मुक्तता द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चौथ्या सत्रात संस्थेचे समन्वयक रावसाहेब पारासूर यांनी समाजातील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यात स्काऊट कसे योगदान देते यांचे स्पष्टीकरण केले. घरातूनच मुलांच्या मनात अंधश्रद्धेचे बीज पेरले जाते. विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ होण्यासाठी स्काऊटचे शिक्षण-प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, यावर त्यांनी जोर दिला. त्यानंतर स्काऊट रशीच्या सहाय्याने विविध 

COMMENTS