देवळाली प्रवरा / प्रतिनिधी राहुरी-ताहाराबाद रस्त्या लगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलामध्ये जिल्हा बँकेच्या सेवा निवृत्त
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी-ताहाराबाद रस्त्या लगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलामध्ये जिल्हा बँकेच्या सेवा निवृत्त बँक कर्मचाऱ्याचा आज १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील रहिवासी तथा जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे हे गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होते. याबाबत पोलीस ठाण्यात मिसिंग बाबत तक्रारही दाखल होती. दरम्यान आज सकाळी घोरपडवाडी येथील जंगलात एक मृतदेह दिसून आला असता स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी पंचनामा केला असता दुचाकी, आधार कार्ड मिळून आले. यावरून चौकशी केली असता सदरचा मृतदेह भाऊसाहेब ब्राम्हणे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नातेवाईकांना बोलवुन ओळखही पटविण्यात आली. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहे. मयत ब्राम्हणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.
COMMENTS