Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन

विवेक कोल्हे यांचा कोपरगाव नगरपालिकेला इशारा

कोपरगाव प्रतिनिधी ः नगर परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराला नागरिक पुरते कंटाळले असून, गेल्या दीड-दोन वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार प

जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे
तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः नगर परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराला नागरिक पुरते कंटाळले असून, गेल्या दीड-दोन वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या समस्या सोडविण्यात व नागरी सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. नगरपालिका प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कोपरगाव शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर प्रश्‍न येत्या 26 जानेवारीपर्यंत सुटले नाहीत, तर नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे यांनी नगरपालिका पंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना दिला.
            कोपरगाव शहरातील विविध प्रश्‍नांबाबत मंगळवारी (3 जानेवारी) नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेली बैठक वादळी ठरली. या बैठकीत युवा नेते विवेक कोल्हे यांनी नगर परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढत न. प. मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासमोर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यावर मुख्याधिकारी गोसावी व न. प. प्रशासन निरुत्तर झाले. गोसावी व अन्य न.प. अधिकारी प्रत्येक प्रश्‍नाला साचेबद्ध उत्तर दिल्याने कोल्हे यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा धारण केला होता. पाणीपुरवठा, बांधकाम, स्वच्छता विभागाशी संबंधित जलशुद्धीकरण, रस्ते, कचरा संकलन व इतर अनेक कामांमध्ये न.प.अधिकार्‍यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारांना मुख्याधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप विवेकभैय्या कोल्हे, पराग संधान, संतोष गंगवाल यांनी केला. कोपरगाव शहरातील 27 हजार मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणार्‍या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आश्‍वासन देऊनही न. प. प्रशासन याबाबत कारवाई का करत नाही? आर.एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेली सुमारे 40 लाखांची देयके वसूल करून सदर एजन्सीस काळया यादीत टाकून सदर एजन्सीसह पेमेंट अदा करणार्‍या सर्व अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धारणगाव रोडवरील लक्ष्मीनगर ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा रस्त्यावरील प्रस्तावित भूमिगत गटार 4 फुटी पाईप टाकून करण्यात यावी, शहरातील नागरी सुविधापासून अद्यापपर्यंत वंचित असलेल्या भागात तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक अशोक लकारे, प्रसाद आढाव, संदीप देवकर, वैभव आढाव, दीपक वाजे,किरण सुपेकर, शंकर बिर्‍हाडे, फकीर मोहम्मद पैलवान, शफीक सय्यद, रंजन जाधव, पप्पू पडियार, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे आदींसह भाजप, शिवसेना, रिपाइं, मनसेचे पदधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

नगरपालिका बनली भ्रष्टाचाराचा अड्डा – कोपरगाव नगर परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असून, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, स्वच्छता विभागाच्या अनेक कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अजूनही भ्रष्टाचार सुरू आहे. सक्षम अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून नगरपालिका प्रशासनाकडून खाजगी एजन्सीला कंत्राट देऊन काम करवून घेतले जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. नगर परिषदेचे खाजगीकरणच झाले आहे. एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या व पदाधिकार्‍याच्या व ठेकेदाराच्या इशार्‍यावर नगर परिषदेचा कारभार चालत आहे. मुख्याधिकार्‍याचे कर्मचार्‍यांवर व कामकाजावर कोणतेही नियंत्रण नाही. इच्छाशक्ती नसणारी नगर परिषद अशी कोपरगाव नगर परिषदेची ओळख झाली आहे. अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे, अशा शब्दांत विवेक कोल्हे यांनी नगर परिषदेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

COMMENTS