Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजीनामा अन् कार्यकर्त्यांचा हुंदका

राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार धक्के देण्यात पटाईत आहेत. कारण समोरच्याला आपले डावपेच माहित न होवू देता, आपण आपली चाल खेळायची असते, हे

राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
ठाकरे गटाचे भवितव्य काय ?
निवडणुकीतील राजकीय नाट्य

राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार धक्के देण्यात पटाईत आहेत. कारण समोरच्याला आपले डावपेच माहित न होवू देता, आपण आपली चाल खेळायची असते, हे पवारांचे कसब अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. असे असतांनाच, त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा
देत असल्याचे जाहीर करून, महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पवारांचे हे धक्कातंत्र त्यांनी उतारवयातून निवृत्त होण्यासाठी निर्णय घेतला की, अजित पवारांना चाप बसावा यासाठी घेतला, हे कळण्याला मार्ग नसला तरी, पवारांनी आपल्या राजकारणाचा प्रत्यय या राजीनाम्यातून दिला आहे.  राष्ट्रवादी फुटणार असल्याच्या भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या वक्तव्यानंतर खा. पवार यांनी उचलेले पाऊल म्हणजे राजकिय क्षेत्रातील मोठ्या उलाढालींना अचानक ब्रेक लागला. तसेच राष्ट्रवादीला फोडण्याच्या छडयंत्रानंतर घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पवार यांची विनवणी करताना राज्यभर पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाला असल्याची माहिती दिली. मात्र,  राष्ट्रवादीचा कोणताही पदाधिकारी कोणत्याही पक्षात प्रवेशासाठी गेला नसल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी विनवणी केल्यानंतर दोन-तीन दिवसाचा पुर्नविचार करण्यासाठी वेळ घेतल्याने या कालावधीत अख्खा महाराष्ट्र पेटून उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवार साहेबांच्या या निर्णयामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील नागरिकांसह कार्यकर्त्यांना चटका लागला आहे.
गेल्या काही वर्षापासून खा. शरद पवार हे कर्करोगाच्या आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते दररोज नव्या जोमाने जनसेवेचे वृत्त निरंतरपणे सुरु ठेवणारे नेते म्हणून पवार यांची ओळख आहे. मधून-आधून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. तसेच वैद्यकिय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते कोणताही दौर्‍याचे नियोजन करत नाहीत. त्यामुळे राजकारणाबरोबरच प्रकृतीचही काळजी घेणे गरजेचे आहेत. त्यामुळे खा. पवार यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांचे समवस्क नेते माजी मंत्री डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी सांगितले. शरद पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडलेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांना वयाची 82 वर्षे पूर्ण झाली आहेत. पाठीमागे 18-20 वर्षापूर्वी त्यांना जिवघेणा कॅन्सर आजाराने पिढले होते. त्यातून ते अथक प्रयत्नांनी बरे झाले. तेंव्हापासून न थांबता आज अखेर परिश्रम घेत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी त्यांना आजारी पडल्यामुळे ब्रिच कँन्डी रूग्नालयात उपचार घ्यावे लागले. त्यातून आता सुदैवाने बरे झाले आहेत. त्यांना पुन्हा तुम्हीच पक्षाचे अध्यक्ष व्हा म्हणून कशाकरिता आग्रह करायचा, असे भावनिक आवाहन महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठमंत्री  डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.
ज्या नेत्याने 50 वर्ष पक्षाचे नेतृत्व केले आहे, त्यांनी निर्णय घेतला की दुसर्‍याला अध्यक्ष करायचे तेंव्हा आपले भावनात्मक संबंध असतात त्यामुळे लोकांना वाईट वाटते. त्यामुळे पक्षात राजीनामा नाट्य असेल. पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्याकडे कुणीही आले नाही. कुणाच्याही पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झाली नाही आणि आमच्यातील कुणीही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क केला नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी वक्तव्य केले. गेल्या महिनाभर महाराष्ट्रातील सरकार कोळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच भाजपने राष्ट्रवादी फुटणार असल्याची वक्तव्ये करत राष्ट्रवादीचे आमदार-खासदार-माजी मंत्र्यांच्या पाठीमागे लावलेला चौकशीचा ससेमिरा असे अनेक मुद्दे चर्चेत आले होते. भाजपने शिवसेनेची केलेली अवस्था पाहता खा. शरद पवार यांनी उभ्या केलेल्या संघटनाला कोठेतरी तडा जावू लागल्याची चर्चा होती. त्यातच अजूनही सध्या सत्तेत असलेले महाराष्ट्रातील सरकारही कोसळले नाही. आजच्या निर्णयानुसार राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

COMMENTS