मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्याचे मुख्यालय असणार्या मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. मात्र, येथील रहिवाशांना याचा कोणताही फायदा न
मेढा / प्रतिनिधी : जावळी तालुक्याचे मुख्यालय असणार्या मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. मात्र, येथील रहिवाशांना याचा कोणताही फायदा न होता तोटाच अधिक दिसत असल्याने सर्व खातेदार, रहिवाशी नागरीक आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. यामुळे सर्व मिळकतधारक, बाधित रहिवाशी व शेतकर्यांनी सोमवार, दि. 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे एकत्रितपणे नगरपंचायतीसमोर आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात जाहीर केले आहे.
प्रसिध्द पत्रकात दिलेल्या माहितीनुसार नगररचना विभागाने केलेल्या सर्वेनुसार मेढा नगरीच्या विकासाचा प्रस्तावीत आराखड्याचा नकाशा नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा दिवसापुर्वी लावला आहे. यामध्ये कोणाची दुकानची जागा, प्रस्तावीत व्यवसायाची जागा तर गुंठ्यातील रस्त्यालगत असणारी शेतजमिन आरक्षित केल्याने येथील त्यांचा दिवाळीचा सण गोड होण्याऐवजी कडू झाला. यामुळे येथील बाधित रहिवाशी व शेतकर्यांनी एकत्र येवून नगरपंचायती विरोधात आंदोलन उभे केले आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात बांधलेल्या इमारतींची अधिकृतरित्या नोंद झाली नाही. तसेच वाढीव घरपट्टीने मिळकतधारक पुरते बेजार झाले आहेत. मेढा नगरीच्या अवास्तव कल्पना दर्शविणारा टाऊन प्लॅनचा नकाशा शेतकरी, रहिवाशांना मातीत घालणारा आहे.
मेढा नगरपंचायतीतील रहिवाशांच्या मिळकती अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करून घरपट्टी कराची झालेली भरमसाठ वाढ रद्द करण्यासाठी ठोस भूमिका आवश्यक होती. मेढा नगरीच्या विकासाकरिता मेढा नगरीत असणार्या शासकिय जागा विचारात विकासाचे नियोजन करायला पाहिजे. तसेच सातारा-महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणात नगरपंचायतीचे आराखड्यात मुख्य रस्त्यांचे अंतर वाढविल्याने मेढा बाजारपेठ अस्तित्वात राहाणार नाही. त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS