Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

सातारा / प्रतिनिधी : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यानुसार 11 पंचायत सम

संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे
लाचप्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस कोठडीत
फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा / प्रतिनिधी : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यानुसार 11 पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे प्रवर्गनिहाय निश्‍चित करण्यात आले होते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे : खटाव पंचायत समिती-अनुसुचित जाती महिला प्रवर्ग, फलटण पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोरेगांव पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, महाबळेश्‍वर पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), खंडाळा पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, पाटण पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, कराड पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, जावली पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, वाई पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, माण पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग व सातारा पंचायत समिती -सर्वसाधारण प्रवर्ग या प्रमाणे पंचायत समिती सभापतींचे आरक्षण निश्‍चित झाले आहे.

COMMENTS