Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल येथील विद्युत भवन कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (२६जानेवारी) रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्य

अखेर सुजीत पाटकरला पोलिसांनी केली अटक
कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
IPL 2023 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला सुपरस्टार रजनीकांतने केला फोन

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल येथील विद्युत भवन कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (२६जानेवारी) रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महावितरणचे माजी संचालक प्रभाकर शिंदे आणि मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व महेंद्र ढोबळे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व दिनकर मंडलिक, कार्यकारी अभियंता योगेश निकम, राजाराम डोंगरे, चेतन वाडे, नंदकिशोर काळे व निलेश चालीकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. ध्वजारोहणापूर्वी संविधान उद्धेशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

COMMENTS