Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात चार ठिकाणी आज फेरमतदान

निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू असून नुकतेच तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र मध्यप्रदेशातील बैतुलमध्ये मतदान झाल्यानंतर मत

थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
हिंमत असले तर मंत्र्यांशिवाय निवडणूक लढवून दाखवा : विक्रमभाऊ पाटील
अभिनेता सलमान खानने मिस्ट्री गर्ल सोबतचा फोटो केला शेअर

नवी दिल्ली ः देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू असून नुकतेच तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र मध्यप्रदेशातील बैतुलमध्ये मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र घेऊन जात असलेल्या बसलेल्या आगीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चार ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडले होते. तेव्हा तिसर्‍या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाताना 7 मे रोजी बसला आग लागली होती होती.बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशिन जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 4 ठिकाणी 10 मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे. बूथ 275- राजापूर, बुथ 276- दुदर रयत, बुथ 279- कुंदा रयत आणि बुथ 280- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेर मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS