केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील उंदरी कुंभारवाडा मार्गे चंदन सावरगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे,सद्या पावसाळ्याचे दिवसआहेत आणी भर पावसाळ्यात

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील उंदरी कुंभारवाडा मार्गे चंदन सावरगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे,सद्या पावसाळ्याचे दिवसआहेत आणी भर पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचुन राहिल्याने शेतकरी व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हे छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या लक्षात येताच केज तहसीलदार यांना रस्ता दुरुस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे.
केज तालुक्यातील उंदरी या गावाला उंदरीहुन चंदनसावरगाव ला जाणारा रस्ता हा खूप दिवसापासून खराब झालेला आहे त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसत असुन या रस्त्यावर गेल्या वीस वर्षांपासून खडी सुद्धा टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे, शेतकर्यांचे,प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे म्हणून तहसीलदार यांना निवेदना व्दारे कळविण्यात आले आहे की,उंदरी कुंभारवाडा मार्ग चंदनसावरगांव अनेक वर्षापासुन खराब झालेला असुन अतिशय दुरावस्था झाली असुन रस्त्यात खड्डा की खडडयात रस्ता अशी रस्त्याची अवस्था झाली आहे.लोकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतआहे. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत तसेच अनेकांचे मणके गेले आहेत.हा रस्ता रहदारीचा असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी,कामगार, कर्मचारी तसेच वयोवृध्द नागरीक जीव मुठीत धरुन प्रवास करतात.दवाखान्या त एका डिलीव्हरी पेशंटला जायचे असेल तर वाटातच डिलीव्हरी होत आहे या गोष्टींचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन तात्काळ आठ दिवसात रस्ता करण्यात यावा.अन्यथा नाविलाजास्तव छावा मराठा संघटना यांच्या कडुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे सदरील निवेदनात छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे यांनी म्हटले आहे यावेळी सुरेशगिरी,अनिलजाधवर,अनिकेत देशमुख,कांबळे अनुरथ यांच्या सह उंदरी व कुंभारवाडा ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
COMMENTS