Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायद्याची भीती मनातून काढून टाका : जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर ’विधी साक्षरता शिबिरइस्लामपूर / प्रतिनिधी : आपले शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण, बेताची आर्थिक परिस्थिती आणि कामाच्य

आष्टा येथे शाळेची व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; अकरा विद्यार्थी जखमी
युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग; 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा : खा. श्रीनिवास पाटील

राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर ’विधी साक्षरता शिबिर
इस्लामपूर / प्रतिनिधी : आपले शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण, बेताची आर्थिक परिस्थिती आणि कामाच्या व्यापा मुळे आपणास कायद्याची माहिती नसणे स्वाभाविक आहे. मात्र आपण कायद्याबद्दलची भीती मनातून काढून टाका. आपल्या लहान मुलांच्याबाबत अन्याय-अत्याचाराची घटना घडली,तर तातडीने कायद्याची मदत घ्या,असे आवाहन इस्लामपूर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी यांनी राजारामनगर येथे ऊस तोडणी मजुरांच्या समोर बोलताना केले.
राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर ’विधी साक्षरता शिबिरात’ ते बोलत होते. इस्लामपूर न्यायालय, वाळवा तालुका पंचायत समिती व इस्लामपूर बार असोसिएशनच्या वतीने आयोजित या शिबिरात ऊसतोडणी मजुरांना कायद्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी यांनी ’बाल लैंगिक अत्याचार’ या विषयावर ऊस तोडणी मजुरांचे प्रबोधन केले. याप्रसंगी इस्लामपूर न्यायालयातील 10 न्यायाधीश व कारखान्याचे पदाधिकारी-अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सहदिवाणी न्यायाधीश के. एम. चंडालिया यांनी ’असंघटीत मजुरांसाठीचे कायदे’या विषयावर मार्गदर्शन केले. आपण दररोज पोटाच्या मागे लागलेला असता. आपणास कायद्याची माहिती कमी राहते. आपण अन्याय, अत्याचार झाला, तर कायद्याकडे धाव घ्या. आपल्यासाठी शासनाने विविध सोई- सवलतींची तरतूद केली आहे. त्याचा लाभ घ्या, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी दिवाणी न्यायाधीश व्ही. जी. चोखंडे, एम. एम. चितळे, जी. एस. दिवाण, जे. जी. वाघ, एम. एन. जयस्वाल, पी. पी. ठाकूर, एच. पी. पंचोली, डी. जे. पंडीत, तसेच कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, शैलेश पाटील, कारखान्याचे सल्लागार अ‍ॅड. राजेंद्र कोपर्डे, महेश पाटील यांच्यासह ऊस तोडणी मजूर व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी आभार मानले. अ‍ॅड. डी. डी. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS