Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवंताच्या नामस्मरणामुळे जीवन आनंदी बनते ः अविनाश महाराज

शेवगाव तालुका ः सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये ध्यान धारणासह नामस्मरण याच गोष्टी जीवनाला सुख व शांती प्राप्त करून देतात. त्यासाठी जीवन जगत असतान

जय मल्हार क्रांती संघटनेकडून आमदार पाचपुतेंचा सत्कार
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे
राहुरीत दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

शेवगाव तालुका ः सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये ध्यान धारणासह नामस्मरण याच गोष्टी जीवनाला सुख व शांती प्राप्त करून देतात. त्यासाठी जीवन जगत असताना आपण काही वेळ तरी नामचिंतनात दिला पाहिजे, भक्ती ही नवविधा असली तरी ती आपण नामस्मरणाचे महत्त्व अधिक असल्यामुळे भगवंत प्राप्तीसाठी नाम जपाचा मार्ग अंगीकृत केला पाहिजे असे मत भायगावचे भूमिपुत्र अविनाश महाराज लोखंडे यांनी मांडले.
    शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील श्री नवनाथबाबा मंदिराच्या प्रांगणात वैकुठवासी नामदेव पाटील लांडे यांनी सुरू केलेल्या व श्री क्षेत्र देवगड संस्थांचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व गहिनीनाथ महाराज आढाव व हरिभाऊ महाराज अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहच्या 56 व्या वर्षातील पहिले पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक पौराणिक ग्रंथांचा संदर्भ देऊन जीवनामध्ये नाम जपाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.तेच मानवी जीवन सुखकर घडू शकते म्हणून जीवनात भौतिक सुविध इतकेच नाम महत्त्वाचे आहे.नामाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक संत चरित्रतील दाखले दिले. यावेळी गणेश महाराज डोंगरे, सुभाष महाराज भागवत, राम महाराज काळे, मल्हारी महाराज परभणे, ज्ञानेश्‍वर महाराज डांगरे, महेश महाराज शेळके,भाऊसाहेब महाराज शेकडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, बापूराव दुकळे, हरिश्‍चंद्र आढाव,कैलास लांडे, अजिनाथ लांडे, उद्धव लांडे, वाल्मीक दुकळे सुदाम खंडागळे, शिवाजी लांडे संतोष आढाव, दत्तू आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तनानंतर सुरेश खंडागळे, जगन्नाथ लांडे,गंगाराम नेव्हल,मोहन दुकळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

COMMENTS