Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्यमान भारत योजनेची बीडमध्ये उल्लेखनीय कामगिरी

राज्यस्तरीय अधिकार्‍यांकडून पत्रकार अमजद खान यांचा सत्कार

बीड प्रतिनिधी - बीड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत हजारो लोकांचे केवायसी करून अनेक रुग्णांना मदत केल्याने बीड य

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार| LOKNews24
आदिवासी समाज नेहमीच अग्रेसर – वाघेर
रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

बीड प्रतिनिधी – बीड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत हजारो लोकांचे केवायसी करून अनेक रुग्णांना मदत केल्याने बीड येथील पत्रकार तथा रुग्णसेवक अमजद खान यांचा आज बीडच्या दौर्‍यावर आलेल्या राज्यस्तरीय टीमने सत्कार केला आहे.
विशेष बाब म्हणजे आयुष्यमान योजनेचा मोमीनपुरा भागात कॅम्प सुरू असताना यातीलच पाच ते सहा लोकांना पाच लाखावरील खर्चासाठी सदरील कार्ड उपयोगी आला व एका अठरा वर्षीय मुलीला पर राज्यात उपचार मिळवून दिल्याने त्यांचे राज्यस्तरी अधिकार्‍यांकडून सत्कार करण्यात आले.यावेळी रिजनल मॅनेजर डॉ.संजय गटकुळ सर, उतज वांढरे (विभागीय अधिकारी) सर, उक शरद पवार(विभागीय प्रमुख) डॉक्टर अशोक गायकवाड वल, संदीप आगलावे वो, श्रीराम राठोड, इमरान खान आरोग्य मित्र, अमोल देवडकर, विशाल बेंद्रे सुपरवायझर, आदींची उपस्थिती होती.यावेळी राज्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी बीड जिल्हा वासियांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा केवायसी करून घेण्याचे आव्हान केले आहे.

COMMENTS