हिंदू ही जीवन पद्धती आहे, असे सांगत भूतकाळात जाऊन काही खोदू नका! त्यामुळे समाजात अशांतता निर्माण होत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ऍड. अश्
हिंदू ही जीवन पद्धती आहे, असे सांगत भूतकाळात जाऊन काही खोदू नका! त्यामुळे समाजात अशांतता निर्माण होत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ऍड. अश्विनी उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती के एम जोसेफ, बी व्ही नागरत्न यांनी हिंदू ही जीवनपद्धती असून, तो धर्म नाही, असा निकाल मध्येच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. नव्या पिढीसमोर अशा कोणत्याही गोष्टी आणू नका की, ज्यामुळे देशात एकात्मता नष्ट होईल; अशा शब्दात ही याचिका फेटाळली. देशाला सतत उकळत्या स्थितीवर ठेवता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावत, ही याचिका फेटाळली. भारत देश हा सेक्युलर आहे. त्यामुळे इतिहास काळात या देशात जे जे काही निर्माण झाले त्यावर नव्याने वाद निर्माण करून नव्या पिढीच्या समोर उद्विग्नता उभी करणे, हा तुमचाही आणि न्यायालयाचाही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या याचिका न्यायालयासमोर आणू नका, अशा शब्दातही ऍड. अश्विनी उपाध्याय यांना न्यायमूर्तींनी खडसावले आहे. ऍड. अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात देशातील वेगवेगळ्या शहरांची नावे जी हिंदू धर्माच्या अनुषंगाने नाहीत, ती बदलून टाकण्यासाठी एका नव्या आयोगाचे गठन करावे, अशा स्वरूपाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र हिंदू धर्मात अशी कोणतीही असहिष्णता नाही किंवा कोणताही फंडामेंटलिझम हा हिंदुत्वात नाही, असे सांगत न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि बी व्ही नागरत्न यांच्या न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. भारत हा सेक्युलर देश असल्याने या देशाच्या संविधानाचे आणि संविधानाच्या सर्व सेक्शनचे रक्षण करणे हे देखील देशवासी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा शब्दातही न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळताना याची काकर्त्याला सुनावले. हिंदू जन किंवा हिंदुत्व हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे आणि या जीवन पद्धतीत कोणताही अतिरेक नाही इतरांच्या संदर्भात द्वेषभाव नाही. त्याचप्रमाणे त्यामुळे या जीवन पद्धतीला एक फंडालिस्ट स्वरूप देण्यापासून सगळ्यांनीच वाचायला हवे कारण देशाच्या नव्या पिढीसमोर आपल्याला या जीवन पद्धतीच्या माध्यमातून सकारात्मक गोष्टी मांडता आल्या पाहिजेत नव्या पिढीला अशांत परिस्थित ढकलण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. त्यासाठी न्यायालयालाही साधन बनवणे आणि याचिकाकर्त्यांनीही साधन बनणे टाळावे किंबहुना तसे करण्याचा आपणांस अधिकार पोहचत नाही. या देशातील सहभाव हा कायम राखला जावा, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी. संविधानाच्या आर्टिकल २१, २५ आणि २९ नुसार आत्मसन्मान, धर्म आणि संस्कृती जोपासण्याऱ्या या गोष्टींचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सार्वभौम देशावरच आहे. अर्थात न्यायमूर्ती जोसेफ आणि न्यायमूर्ती नागरत्न यांनी हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे हे स्वतः सांगितलेले नसून या संदर्भातला निर्णय 1994 मध्ये न्यायमूर्ती एस पी भरूचा यांनी दिला होता. इस्माईल फारुकी या खटल्यामध्ये न्यायमूर्ती भरूचा यांनी म्हटले होते की, ” हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे; आणि हिंदुत्व याचा अर्थ रूढी परंपरा असणारा धर्म नव्हे, अशा पद्धतीने त्यांनी त्याकाळी व्याख्या केली होती. त्याच व्याख्येला आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुढे नेले. एकंदरीत धर्माच्या अनुषंगानं धर्म हा आपल्या व्यक्तिगत जीवनाची बाब असतो. तो सामूहिक पातळीवर सांस्कृतिक अंगाने अभिव्यक्त होतो. परंतु धर्माला व्यक्त करणे हे हिंसक, असहिष्णू पध्दतीने नव्हे तर सत्कार्मानेच तो व्यक्त व्हायला हवा.
COMMENTS