Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी 46 हजार अर्ज

पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6058 घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत अखेर संपली आहे. या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 46 ह

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या उपस्थितीत शिर्डीला होणार जिल्हा काँग्रेसची बैठक
भागुजीराव ढेकळे विद्यालयाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सदिच्छा भेट
आषाढी एकादशीच्या दिवशी भगरीतून 70 जणांना विषबाधा .

पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6058 घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत अखेर संपली आहे. या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 46 हजारांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. दरम्यान आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज, सोमवारी रात्री 12 वाजता ही मुदत संपणार असून यात तीनशे-चारशे अर्जांची भर पडण्याची शक्यता आहे.

पुणे मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी औरंगाबाद मंडळाच्या 936 घरांच्या सोडतीला अतिशय थंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कारण दोन आठवड्यांत (9 ते 26 फेब्रुवारी) या घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ 218 अर्ज जमा झाले आहेत. पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांची सोडत नव्या सोडत प्रकियेनुसार आणि नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून काढली जात आहे. त्यानुसार कायमस्वरुपी एक नोंदणी प्रक्रियेस 5 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 5 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान एक लाख 16 हजार 547 जणांनी नोंदणी केली आहे. तर रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 65 हजार 671 जणांनी पुणे सोडतीसाठी अर्ज भरले आहेत. पण प्रत्यक्षात यातील 46 हजार 402 जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरत अर्ज सादर करण्याची मुदत आज, सोमवारी रात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे एकूण अर्जांचा आकडा फारतर 47 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. पुणे मंडळाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी 6058 पैकी प्रथम येणार्‍यास प्राधान्य योजनेतील 3010 घरांना मात्र अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. 3010 घरांसाठी रविवारपर्यंत 2356 इतकेच अर्ज सादर झाले आहेत. त्यातही अंदाजे 1737 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी आता नव्याने सोडत काढण्याची वेळ पुणे मंडळावर आली आहे. त्यानुसार ही घरे पुन्हा सोडतीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली. दरम्यान औरंगाबाद मंडळातील 936 घरांसाठी 9 फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. त्यानुसार दोन आठवड्यांत, 9 ते 26 फेब्रुवारीदरम्यान या घरांसाठी केवळ 503 अर्ज भरण्यात आले आहेत. केवळ 218 जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले असून, 13 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

COMMENTS