Homeताज्या बातम्यादेश

पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

तात्काळ अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाचे मत

नवी दिल्ली ः केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पूज

अटकेची कारवाई टाळण्यासाठी पूजा खेडकर पळाली
पूजा खेडकरच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी  
‘आयएएस’ पूजा खेडकरची निवड रद्द !  

नवी दिल्ली ः केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. यावर सोमवारी सुनावणी झाली असून, पूजा खेडकरला तात्काळ अटक करणे आवश्यक नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे तिला अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
याप्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती म्हणाले की, हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीची बाजू मांडली. याप्रकरणाची 21 ऑगस्टला सविस्तर सुनावणी होणार असल्याचे सांगितले. 21 ऑगस्टला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असल्यामुळे तोपर्यंत पूजा खेडकरला दिलासा मिळाला. पटियाला हाऊस कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दिल्ली क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आपल्याला दिल्ली क्राईम ब्रँचने अटक करू नये यासाठी पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले. दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलिस आणि यूपीएससीला नोटीस बजावली.

COMMENTS