Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणंदमध्ये तुंबलेल्या गटाराला मिळाली मुक्ती; दैनिक लोकमंथनच्या बातमीचा इफेक्ट

लोणंद : प्रभाग क्र. 5 मध्ये पहिल्या छायाचित्रात तुंबलेले गटार स्वच्छ केले. त्याच गटासमोर गटारातील घाण टाकून घाणीचे साम्राज्य झाले. (छाया : सुशिल गायक

सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई
मंगळवेढा तालुक्यात विषबाधा; दोन लहान मुलींचा मृत्यू
शिराळा येथे चारचाकी व मोटरसायकल अपघात; एक जखमी तर एक मयत

लोणंद / प्रतिनिधी : लोणंदमध्ये तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ही बातमी दैनिक लोकमंथन मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुंबलेल्या गटाराबाबत शासन व प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. या बातमीची चर्चा तर झालीच शिवाय या तुंबलेल्या गटाराला मुक्ती मिळाली. या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून स्वच्छतेचे दूत असलेल्या कर्मचार्‍यांमार्फत या तुंबलेल्या गटाराला स्वच्छ करण्यात आले आहेत. तुंबलेले गटार स्वच्छ झाल्याने गटारातील पाणी सुध्दा आता झुळू झुळू वाहू लागले आहे. गटारास मोकळा श्‍वास मिळवून देण्यात आलेला आहे.
ज्या पद्धतीने ही समस्या सोडविण्यासाठी कृतिशील पाऊले पडली. तशीच पाऊले प्रत्येक समस्येबाबत पडायला हवीत. अशीच अपेक्षा प्रत्येक नागरिकांची आहे. ज्या-त्या प्रभागातील नागरिकांच्या दृष्टीने स्वच्छता ही खुप महत्वाची असते. यासाठी कृतिशील कार्य व्हायलाच हवे. परंतू तुंबलेल्या गटाराची एक समस्या सोडविली तरी दुसर्‍या समस्येला तिथेच जन्म दिला आहे. तुंबलेले गटार काढले पण त्या गटारातील घाण तिथेच पडून राहिल्याने अस्वच्छता अजून झाली आहे. अगोदरच या गटाराच्या अवती भवती अस्वच्छता होती. त्यात तुंबलेल्या गटाराने तर पाणी बाहेर येऊन येऊन दुर्गंधी झाली होती. आज हे तुंबलेले गटार स्वच्छ झाले असूनही त्याच ठिकाणी गटारातून बाहेर काढलेली घाण तशीच पडून राहिली आहे. त्यामुळे अजून तिथेच घाणीचे साम्राज्य आहे. गटार तर स्वच्छ केले पण तिथल्या घाणीचे काय? ती घाण तशीच पडून ठेवायची का? ती घाण कुणी उचलायची? एक समस्या तर दूर केली जाते आहे. पण तिथेच दुसरी समस्या उद्भवलेली पाहायला मिळत आहे. अशी अर्धवट कामे केली जात असल्याने समस्या ह्या समस्याच राहायला लागलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही समस्या सोडविताना योग्य नियोजन व्हायला हवे. प्रत्येक समस्येला पूर्ण करण्यासाठी जीवावर आल्यासारखी कामे करता कामा नये.
नागरिकांच्या दृष्टीने समस्या सुटत असताना नागरिकांकडून कौतूकाची थाप पडली पाहिजे. यासाठी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविल्याच पाहिजेत. अस्वच्छता हा असा विषय आहे की, यामुळे अनेकांना आजारी पडण्याची वेळ येत असते. त्यामुळे स्वच्छता म्हणजे स्वच्छता झाली पाहिजे. हे झाले तरच स्वच्छतेसाठी यंत्रणेकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे लोकांना ही समाधान वाटेल.

हीच का आपली स्वच्छता मोहीम? तुंबलेले गटार स्वच्छ झाले. अन तिथेच घाणीचे साम्राज्य केले…
स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी एक पाऊल पुढे असले पाहिजे. कारण ही स्वच्छताच आपल्या गावाची, शहराची शान असते. स्वच्छतेचा मंत्र हाच आपल्या गावाला आणि शहराला सुंदर बनवित असतो. स्वच्छ लोणंद आणि सुंदर लोणंद जेव्हा आपण म्हणत असतो. तेव्हा प्रत्येक ठिकाणी स्वच्छताच स्वच्छता दिसायला हवी. तुंबलेले गटार स्वच्छ केले याबद्दल अभिनंदनच… पण तुंबलेल्या गटारातील घाण तिथेच ठेवुन अजून अस्वच्छता झाली त्याचे काय? घाणीची योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक होते. परंतू ती घाण अजूनही तिथेच ठेवण्यात आली आहे. तुंबलेले गटार तर स्वच्छ झाले पण तिथेच घाणीचे साम्राज्य केल्याने हीच का आपली स्वच्छता मोहीम? असा प्रश्‍न उपस्थित राहिला आहे.

COMMENTS