Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथीलता

मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने पोलिस भरती संदर्भातील जाहिरात काढल्यानंतर प्रशासकीय कारण देत या भरतीला तात्पुरती स्थगित

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड
अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स l Lok News24
व्यसनातून पिढी बरबाद होऊ नये – सुषमा अंधारे 

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने पोलिस भरती संदर्भातील जाहिरात काढल्यानंतर प्रशासकीय कारण देत या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र शुक्रवारी राज्य सरकारने पोलिस भरतीच्या कमाल मर्यादेत शिथीलता दिल्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणार्‍या हजारो उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्‍नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

COMMENTS