Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप गरजेचा : महेश भोजने

श्रीगोंदा : सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून ट्रॅक्टर ट्रेलर बैलगाडी व ट्रक या वाहनातून प्रामुख्याने ऊस वाहतूक होत असते. अशा वाह

अहमदनगर शहरात डी-मार्ट मॉलचे उद्घाटन
राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचे पुरस्कर्ते ः मुरकुटे
शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज

श्रीगोंदा : सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून ट्रॅक्टर ट्रेलर बैलगाडी व ट्रक या वाहनातून प्रामुख्याने ऊस वाहतूक होत असते. अशा वाहनांना मागे व पुढे रिफ्लेक्टिव्ह टेप न लावल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना मागे व पुढे रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश भोजने यांनी केले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी वाहन चालकांचा मेळावा घेऊन त्यामध्ये ऊस वाहतूक करत असताना घ्यावयाची काळजी याबाबत भोजने यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी भोजने म्हणाले की, रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकिंग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होण्याचा जास्त संभव असतो. त्याकरिता सदर वाहनांना मागे व पुढे रिफ्लेक्टर लावणे तसेच वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे, ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना मोठ्या आवाजाची म्युझिक सिस्टीम न लावणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहने चुकीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे करणे, ऊस ट्रायलीच्या बाहेर भरणे अशा प्रकारच्या गोष्टीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाहन चालकांनी योग्य ती काळजी घ्यावी. वाहन वेगावर मर्यादा ठेवावी, वाहन ओव्हरटेक करत असताना काळजी घ्यावी, चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना भोजने यांनी वाहन चालकांना दिल्या. यावेळी नागवडे कारखान्याचे शेतकी अधिकारी सचिन बागल, बी. जी. काटे, राजेंद्र भुजबळ, वसंतराव गिरमकर, भाऊसाहेब बांदल, राहुल नागवडे उपस्थित होते.

COMMENTS