Homeताज्या बातम्यादेश

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात

सिलेंडर 115.50 रुपयांनी झाला स्वस्त

नवी दिल्ली प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढत असतांना, त्यात कोणतांही दिलासा मिळत नसतांना मात्र मंगळवारी केंद्र

तिरुवन्नामलाईमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू
दत्त शुगर कारखान्यातील प्रदुषणामुळे साखरवाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जेथे पुस्तक तेथे भारी मस्तक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

नवी दिल्ली प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढत असतांना, त्यात कोणतांही दिलासा मिळत नसतांना मात्र मंगळवारी केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. परंतु, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत. आता मुंबईत व्यावसायिक सिलेंडर 1844 ऐवजी 1696 रुपयांना मिळेल. दिल्लीत 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1859.5 रुपये होती. मुंबईत 1844 मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता 1696 रुपयांना मिळणार आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1893 रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी 2009.50 रुपये मोजावे लागत होते. आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1846 रुपये असेल, जी आधी 1995.50 रुपये होती.जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे.

COMMENTS