वाशी ः गुढीपाडवानिमित्त एपीएमसी फळ बाजारात आंब्याची मोठी आवक झाली आहे. गतवर्षी 25 हजार आंब्याच्या पेट्या गुढीपाडव्याला दाखल झाल्या होत्या. यंदाच्

वाशी ः गुढीपाडवानिमित्त एपीएमसी फळ बाजारात आंब्याची मोठी आवक झाली आहे. गतवर्षी 25 हजार आंब्याच्या पेट्या गुढीपाडव्याला दाखल झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी आंब्याची आवक दुप्पट झाली आहे अशी माहिती व्यापार्यांसह सचांलक संजय पानसरे दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणार्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. यंदा 50 हजार आंब्याच्या पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्या आहेत. यासोबतच आंब्याचे दरही 300 ते 800 रुपये डझन असून सणासुदीला आंबे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे असेही संजय पानसरे यांनी नमूद केले.
COMMENTS