मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. मुंबईत 5
मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. मुंबईत 57 दिवसानंतर 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात पुन्हा बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली जावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
टास्क फोर्सने तशी शिफारस या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह टास्क फोर्समधील इतर सदस्य या बैठकीला हजर होते. सध्या कोरोना रुग्णवाढी मोठी नसली, तरिही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. अशातच अनेक कोरोना रुग्ण घरच्या घरीच टेस्ट करुन घरच्या घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांना क्वारंटाईन करणे गरजेचे असल्याचेही मत या बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पण तसे होत नसल्याचेही टास्क फोर्सकडून सांगण्यात आले. मुंबईत कोरोना रुग्णवाढ पुन्हा होत असल्याचे चित्र आहे. 57 दिवसांनंतर मुंबईत 100 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. 25 एप्रिलच्या तुलनेत मुंबईत थेट दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. 25 एप्रिलला 45 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 26 एप्रिल रोजी बीएमसी कडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 85 रुग्ण बरे झआले आहे. सध्याच्या घडीला एकट्या मुंबईत 549 सक्रिय रुग्ण आहे. तर मुंबईतचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका आहे. दरम्यान, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता सहा ते बारा वर्ष वयाच्या मुलांनाही कोरोना लस देण्यात मंजुरी देण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी होणार मास्कसक्ती
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्कसक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, या बैठकीनंतर कदाचित या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्या मिटींगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे. असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.
महाराष्ट्र सुरक्षित झोनमध्ये : आरोग्यमंत्री टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे त्यानुसार कार्यवाही आपण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही असे ठवरले आहे की, पहिले सूत्र म्हणजे तपासण्या, तर आज आपण 25 हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही 25 हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरुपात महाराष्ट्र हे तसे जर पाहिले तर मी म्हणेण खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचे देखील काही कारण नाही. याचे कारण म्हणजे 929 आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी 65 ते 70 हजार केसेस बघितलेल्या आहेत.
COMMENTS