बंडखोर आमदारांची मंत्रिपदे काढली ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडखोर आमदारांची मंत्रिपदे काढली ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचे फेरवाटप

मुंबई : राज्यात एकीकडे कायदेशीर पेच निर्माण झाला असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी शिंदे गट विरोधात महाविकास आघाडी यांची कायदेशीर लढाई सुरु असतांना, मु

ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम
Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)
महसूल ची कार्यवाही बळेगाव येथील चार वाळू तस्कंराविरुद्धात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : राज्यात एकीकडे कायदेशीर पेच निर्माण झाला असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी शिंदे गट विरोधात महाविकास आघाडी यांची कायदेशीर लढाई सुरु असतांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची मंत्रिपदे काढून घेत, खात्यांचे फेरवाटप करण्यात आले आहे.
जनहिताची कामे अडकून राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. यात मंत्री, राज्यमंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप केलं आहे. सध्या अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. बंडखोर आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खातं सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरेंकडे दिले आहे. तर गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. दादाजी भुसे यांच्याकडचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण हे खाते, तसेच संदीपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खातं शंकर गडाख यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडावी त्यात काही अडथळा येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार कार्यनियमावलीतील नियम 6- अ मध्ये 6- अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली काम पार पाडणे शक्य नसल्यास त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या अनुपस्थित आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतक कोणत्याही मंत्र्यांस निर्देश देता येऊ शकतो. तसेच जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पूर्ण करण्यास शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांना इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही काम पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेतला आहे.

मंत्र्यांकडील खातेवाटपात बदल
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

COMMENTS