देवळाली प्रवरा ः समकालीन प्रकाशनाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी राबवत असलेला जागर वाचनाचा उपक्रम स्त
देवळाली प्रवरा ः समकालीन प्रकाशनाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी राबवत असलेला जागर वाचनाचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे वाचन चळवळ बळकट होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी केले. जागर वाचनाचा उपक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील 13 शाळांना ग्रंथालयासाठी प्रेरणादायी पुस्तकांचा संच प्रदान करण्यात आले.त्या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी तुंबारे बोलत होते.
यावेळी पत्रकार हल्लाकृती समितीचे उत्तर जिल्हा समन्वयक व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष पञकार राजेंद्र उंडे, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर, सुमन सातपुते, राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, शिक्षक नेते कल्याण राऊत, शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल मांगुडे,राणी साळवे इंदुमती देवरे, संदीप सांगळे, दत्तात्रय रोडे, छाया तुपे, सुरज धनवडे, प्रशांत जवंजाळ आदी उपस्थित होते. तुंबारे पुढे म्हणाले की, वाचन हा ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे. वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो.मोबाईल वापरामुळे वाचन कमी होत आहे. वाचन प्रेरणा रुजवण्यासाठी समकालीन प्रकाशन करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. शालेय वयात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी समकालीन प्रकाशनाने दिलेला प्रेरणादायी पुस्तकांचा संच निश्चितच उपयुक्त आहे. समकालीन प्रकाशनाच्या वतीने संच उपलब्ध करून देण्यासाठी राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे, गणेश शिंदे, किरण इघे आदींनी प्रयत्न केले.
जागर वाचनाचा आणि त्यांचे अर्थसहाय्य – जागर वाचनाचा उपक्रमांतर्गत प्रेरणादायी पुस्तकांचा संच शाळांना मोफत वितरित करण्यासाठी विवेक कर्वे, सिद्धांत खांडेकर, पूजा अग्रवाल, शंतनू नाडकर, नितीन दादरवाला, माधवी भट, अर्चना जोशी, संदीप कुंटे, मारुती अत्रे, हर्षद चासकर, निर्मला फौजदार आदींचे अर्थसहाय्य मिळाले.
COMMENTS