रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला

दिव्यांग नागरिकांना उच्च दर्जाच्या आणि चांगल्या प्रतीच्या किराणा वाटला

अमरावती प्रतिनिधी  - रवी राणा(Ravi Rana) यांनी थेट बच्चू कडूं( Bachu Kadu) च्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केलं. बेलोरा येथे दिवाळी निमित्

दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय- बच्चू कडू 
शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा लिलाव करणाऱ्यांचे आम्ही हात पाय तोडू – बच्चू कडू
अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

अमरावती प्रतिनिधी  – रवी राणा(Ravi Rana) यांनी थेट बच्चू कडूं( Bachu Kadu) च्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केलं. बेलोरा येथे दिवाळी निमित्त गावात मोफत किराणा वाटप करण्यात आलं. गरीबांनाही दिवाळी आनंदानं साजरी करण्यात यावी यासाठी राणा दाम्पत्यानं किराणा वाटप केलं. दरम्यान गावकऱ्यांनीही राणा दाम्पत्याचं तोंड भरून कौतुक केलं. बच्चू कडूंनीही अशी मदत कधी केली नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं. बेलोरा गावातील गोरगरीब, गरजू, दिव्यांग नागरिकांना उच्च दर्जाच्या आणि चांगल्या प्रतीच्या किराणा किटचे वाटप करण्यात आलं. गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार रवी राणा यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंति केली होती. अखेर रवी राणांनी नागरिकांची गरज ओळखून त्यांना खुल्या हातानं मदत केली.

COMMENTS