Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेशन वाटप दुकानदार सर्व्हरच्या अडचणीमुळे त्रस्त

अनेक ठिकाणी होत आहे रेशन वाटप करतेवेळी वाद

कोपरगाव शहर ः शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून देशभरातील पात्र रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा गावातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या

ढोरसडे शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन मोलाचे – आदिती तटकरे
आमदारांनी धरला दिंडीतील वारकर्‍यांसमवेत फुगडी व फेर

कोपरगाव शहर ः शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून देशभरातील पात्र रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा गावातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु धान्याचे वाटप करत असताना वापरण्यात येत असलेल्या मशीनला नेहमीच सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असल्याने रेशन दुकानदारांना व रेशन धारकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढत सर्व्हरच्या अडचणी शासनाने सोडवाव्या अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे संलग्न असलेल्या अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार कोपरगाव शाखेच्या पदाधिकार्‍यांनी कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देत केली असून सदर निवेदनाची प्रत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी स्वीकारली आहे.
याप्रसंगी कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव चरमळ, उपाध्यक्ष फकीरराव टेके, खजिनदार जनार्दन जगताप यासह रवींद्र पोळ, बाळासाहेब मवाळ, सागर नरोडे, राजेंद्र देवकर, बाळासाहेब दवंगे, भानुदास पवार, आर.एन पाठक, मयूर खंडीझोड, बि.डी गायकवाड, प्रभाकर खैरनार, संजय खिल्लारी, अनिल चव्हाण, संभाजी सिनगर, मच्छिंद्र आहेर,हरी टेके आदी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यांच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 7 जुलै 2024 पासून ई-पॉस मशीनवर ऑनलाईन धान्य वाटप करताना अचानक बंद पडत असलेल्या सर्व्हर मुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे यामुळे अनेकदा ग्राहकांसोबत तक्रारी देखील होत आहे. अद्याप 60 टक्के धान्य वाटप करणे बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सर्व्हरच्या अडचणी दूर कराव्या नाहीतर ऑफलाइन धान्य वाटप करण्यास परवानगी देत त्यास मुदतवाढ द्यावी हे जर शक्य नसेल आणि वेळेत धान्य वाटप पूर्ण न झाल्यास किंवा लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहिल्यास त्यास रेशन दुकानदारास कोणत्याही प्रकारे जबाबदार धरण्यात येऊ नये अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाकडे केली आहे.

COMMENTS