Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी ठाकरेंची होणार चौकशी ?

अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरण

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात ठाकरे गटातील 40 आमदार फुटल्यानंतर पक्षासह चिन्हही ठाकरे गटाच्या हातातून निसटले असून, अनेक सहकार्‍यांच्या ईडी, सीबीआय चौ

मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
राज्यात द्वितीय आलेल्या तनुश्रीचा संस्थेतर्फे सत्कार
इस्लामपूरात दूषीत पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सुजित थोरात

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात ठाकरे गटातील 40 आमदार फुटल्यानंतर पक्षासह चिन्हही ठाकरे गटाच्या हातातून निसटले असून, अनेक सहकार्‍यांच्या ईडी, सीबीआय चौकशा सुरू आहेत, त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अलीबागमधील 19 बंगला घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी संबंधित विभागात तक्रारही केली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल. मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही, असा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलिस ठरवतात. सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे पोलिस करतील. मी एवढेच सांगतो जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

COMMENTS