Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळकरी मुलीवर बलात्कार; तरुणावर गुन्हा

पुणे/प्रतिनिधी ः शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरेश अण्णा धनगर (र

शेतरस्ते अतिक्रमणमुक्तीसाठी प्रशासनाकडून मोहीम
काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण
पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी

पुणे/प्रतिनिधी ः शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरेश अण्णा धनगर (रा. ताडीवाला रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीशी आरोपी धनगरने मैत्री करुन तिला जाळ्यात ओढले. मुलीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने तिला मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी धनगरने दिली होती. त्याच्या त्रासामुळे मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा येरवडा परिसरात घडल्याने पोलिसांनी संबंधित गुन्हा येरवडा पोलिसांकडे तपासासाठी सोपविला असून, पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करत आहेत.

COMMENTS