Homeताज्या बातम्याविदेश

 अमेरिकेत वॉलमार्ट स्टोरमध्ये बेछूट गोळीबार

१० नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला आहे

अमेरिका प्रतिनिधी  - अमेरिकेत बेधुंद गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकेच्या वर्जिनिया प्रांतात अशीच एक गोळीबाराची घटना घडली आहे. वॉलमार

नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल
पीएमपीची दोन नव्या मार्गावर सेवा सुरू
राऊत दाम्पत्याच्या अमृतमहोत्सवाला हजारोंची गर्दी

अमेरिका प्रतिनिधी  – अमेरिकेत बेधुंद गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकेच्या वर्जिनिया प्रांतात अशीच एक गोळीबाराची घटना घडली आहे. वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये ही घटना घडली असून, गोळीबारात आतापर्यंत १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेसंबंधी शहरातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या वर्जीनियाच्या वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये बंदूकधारी व्यक्तींनी नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी गोळीबार करणारा शूटरही मारला गेला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १० नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चेसापीक पोलिसांनीही वॉलमार्टच्या स्टोरमध्ये गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

COMMENTS