Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमेश बारसकर यांची पवार गटाकडून हकालपट्टी

सोलापूर ः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 11 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश

शेतकरी संघटना विधानभवनावर धडकली ; कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क हटवा
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा

सोलापूर ः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 11 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान रमेश बारसकरांवर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र, 7 दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रमेश बारसकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

COMMENTS