पंढरपुर प्रतिनिधी - एकनाथ शिंदे(Eknath shinde) समर्थक माजी आमदार रामदास कदम(Ramdas Kadam) आणि शहाजी पाटील(Shahaji Patil) हे शिवसेनेचे पक्ष प्रम
पंढरपुर प्रतिनिधी – एकनाथ शिंदे(Eknath shinde) समर्थक माजी आमदार रामदास कदम(Ramdas Kadam) आणि शहाजी पाटील(Shahaji Patil) हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करीत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे व्यक्तव्य करीत आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात, असे उद्गार काढत समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. असा आरोप करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पंढपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून रामदास कदम आणि आ.शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
COMMENTS