Homeताज्या बातम्यादेश

नागालँडमध्ये रामदास आठवलेंचा डंका

RPI आठवले गटाचे २ उमेदवार विजयी

नागालँड प्रतिनिधी - नागालँड मध्ये ६० पैकी ५७ विधानसभेच्या जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या युतीने चांगली आघाडी घेत बहुमताचा आकडा पार

पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात | DAINIK LOKMNTHAN
अंबादास झावरे यांचे निधन
घराचा दरवाजा तोडून दागिने घेवून चोरटे पसार  

नागालँड प्रतिनिधी – नागालँड मध्ये ६० पैकी ५७ विधानसभेच्या जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या युतीने चांगली आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपसह त्यांच्या सहकारी पक्षांनी ३४ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे. तर एनपीएफ दोन जागी आघाडीवर आहे. आतापर्यंत पाच जागांचे निकाल लागले आहेत. यात दोन जागा भाजपने तर दोन रामदास आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एका जागी एनडीपीपीने विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या इमतीछोबा यांनी तुनसंग सदर दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी एनडीपीपीचे उमेदवार के ओडिबेनडंग चांग यांचा ४०० मतांनी पराभव केला. पहिल्यांदाच आरपीआयने नागालँडमध्ये निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दोन जागा जिंकल्या आहेत. नागालँडच्या विधानसभेत ६० जागा असून याचे निकाल आज लागणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झालीय. सध्या नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप युतीचे सरकार आहे. एऩडीपीपीने ४० तर भाजपने २० जागा लढवल्या आहेत. २०१८ च्या निव़डणुकीत भाजप एनडीपीपी युतीने एकूण ३० जागा जिंकल्या होत्या. या भाजपने १२ तर एनडीपीपीने १८ जागी विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २०१८ मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती.

COMMENTS